web-ads-yml-728x90

Breaking News

चिपळूणमध्ये रॅपिड टेस्ट किट खरेदी करण्याची नगरसेवक विजय चितळे यांची मागणी


BY - संतोष पिलके,युवा महाराष्ट्र लाइव - चिपळूण|
कोरोना सारख्या विषाणूने जागतिक महामारी सारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना चिपळूण शहरात गेले काही दिवस covid-19 या आजाराने त्रस्त नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपालिकेने रॅपिड टेस्टिंग किटची मागणी करून उपलब्धता करावी अशी आग्रही मागणी चिपळूण नगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक विजयशेठ चितळे यांनी केली आहे. 
        येणाऱ्या काळात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे येथून गणेशभक्तांचे आगमन या शहरात होणार आहे. आणि सध्या चिपळूण शहरात covid-19 च्या रुग्णांचा प्रसार ज्या प्रमाणात होत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात सदर आजाराचा प्रसार वाढणार आहे. त्यामुळे शहरातून रॅपिड टेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग होणे गरजेचे वाटते. तरी नगरपालिकेने शहरासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक आहे.नगरपालिकेने विशेष तरतूद करून सदर किट खरेदी करावी अशी मागणी चितळे यांनी नगराध्यक्षा सौ सुरेखा खेराडे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

No comments