BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
आंबेडकरी चळवळीला
आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळाले नाही, मोर्चे आंदोलनच्या माध्यमातून आपण आपला आवाज
बुलंद करीत एकजुटीने विषय मार्गी लावतो रिपब्लिकन नावाने आसणारे अनेक पक्ष संघटनेच्या
पदाधिकारी कार्यकर्त्यांनवर आजही आंदोलनाचे
गुन्हे दाखल आहेत मा.न्यायालयाची तारीख पे तारीख करत फेर्या चालू आहेत अशात केस तर काय नील झाली नाही पण शिक्षण आसून नोकरी ही मिळाली
नाही आंदोलन करा पण लोकशाही मार्गाने रितसर
पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस स्टेशन,मधे निवेदन देऊन आंदोलनाची माहिती द्या संबंधित
विभागाकडे मागणीचे निवेदन सादर करा दिलेल्या निवेदनाचा नियमित पाठपुरावा करा लोकशाही
मधे तुम्ही केलेल्या आंदोलनाची दिलेल्या निवेदनाची दखल घ्यावीच लागती आम्ही ही अनेक
आंदोलन केली व गुन्हे ही दाखल झाले त्यानंतर उद्भवणाऱ्या परीस्थितीला ही सामोरे गेलो
सध्या सोशल मीडिया मधून उटसुट लाईव्ह येऊन अनेकजण बकबक करतात त्यास पाहून उत्तेजित
न होता परमपूज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मार्गाचे अवलंब करा
स्वतावर गुन्हे दाखल होतील आसे आंदोलन करु
नका प्रसिध्दी आज मिळेल पण उद्या तुमच्या सोबत न्यायालयात कोणी नसेल मित्रानो चळवळीला
तुमची गरज आहे आणि आपली चळवळ वैचारिक आहे
Post a comment