महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री . अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेखर निकम मित्र मंडळ माखजन विभाग , ता . संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
BY - संतोष पिलके, युवा
महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
संपूर्ण जगभरात फैलावलेल्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे . कोरोना
बाधित रुग्णांकरीता सातत्याने रक्ताची गरज भासत आहे.याकरीता राज्याचे आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषदवार
रक्तदान शिबीर मोहिम घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.आतापर्यंत मतदारसंघातील विविध भागात ३ रक्तदान
शिबीरे चांगल्या उत्स्फूर्तपणे पाड पडले . मोहिमेतील चौथे रक्तदान शिबीर आज रोजी
संगमेश्वर तालुक्यातील शेखर निकम मित्रमंडळ माखजन विभागाच्या वतीने महाराष्ट्र
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा
रुग्णालय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले होते . या रक्तदान
शिबीराकरीता धामापूर , नारडूवे
, कासे , पेढांबे , सरंद , माखजन , आरवली ,
कोंडिवरे , आंबव , कळंबुशी
, मुरडव , करजुवे इत्यादी गावांतील
तरुणांनी सहभाग घेऊन ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले . या रक्तदान शिबीराच्या
उद्घाटन प्रसंगी आमदार शेखर निकम , सरंद हायस्कूलचे
पदाधिकारी दिपक पोंक्षे , मुख्याध्यापक आंबादास घाडगे ,
बापट सर , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका
उपाध्यक्ष शेखर उकार्डे , माजी पंचायत समिती सदस्य सुरेश
कांगणे , मयुर बाष्टे , सुशिल भायजे ,
सुरेश घडशी , नेटके बुवा , गणपत चव्हाण , अजित आलेकर , रुपेश
गोताड , कृष्णा जोगले , सुरज जोगले ,
अक्षय चव्हाण , अनिकेत कोळंबी , समिर लोटणकर , बबुशेठ कवळेकर आदी मान्यवर
बहुसंख्येने विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते . ,
No comments