web-ads-yml-728x90

Breaking News

देवेंद्र किसन भोर्इर याचे दहावीमध्ये सुयश...


BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |
कुटूंबाची परिस्थिती कशीही असो परंतु जिद्द,चिकाटी,ध्येय सोडले नाही पाहिजे या उद्देशाने वाटचाल करून शिक्षण घेत असलेल्या मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील देवेंद्र किसन भोर्इर याने दहावी परिक्षेत सुयश संपादन केले आहे.वडिलांची मेहनत आणि त्यांची इच्छा या दोन्ही भागाचा विचार लक्षात घेता आर्थिक परिस्थितीतुन बिकट असताना उंच शिखर गाठणार्‍या देवेंद्र भोर्इर याच्या यशामागे त्याच्या आर्इवडिलांचे व त्याच्या कुटूंबाचा महत्वाचे योगदान ठरले आहे.प्रत्येक यशामागे कोणीतरी एक गुरू असतो या तरूणाच्या मागेही त्याचे शिक्षक आणि देवाचे रूप त्याचे आर्इ वडिल यांचे आशिर्वाद असल्यानेच देवेंद्र भोर्इर याने हे विजय शिखर गाठले आहे.त्या यशाने सर्वत्र तालुक्यात,गावात तसेच कुटूंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.

No comments