web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनायोध्दा म्हणून सौ.सुवर्णा शिंदे यांचा सन्मान


BY - युवा महाराष्ट्र लाइव- डोंबिवली |
जेव्हा कोरोना आला तेव्हापासून त्या तार्इनी कोरोनाच्या विळाख्यात असलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी स्वतःची पर्वा न करता नर्स म्हणून जी भुमिका आणि जे कर्तव्य जपायचं होतं ते सर्व काही जपून कर्तव्यावर राहून कोरोना नागरिकांची सेवा करून त्यांना बरे करण्यात तिच्या सेवाचा वाटा असल्याने अहोरात्र जबाबदारी सांभाळली आणि कोरोनावर मात करण्यास आपल्या नर्स क्षेत्रातून कोरोना बाधितांची सेवा करत दिलासा देऊन त्यातूनच काळजी घेण्याची जनजागृती केली तिच्या याच समाजसेवी कार्याला पाहून सौ.सुवर्णा अनिल शिंदे (नर्स - शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली) या तार्इला ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेनी कोरोनायोध्दा म्हणून सन्मापत्र देऊन तिचा सन्मान केला आहे.
आरोग्य सेवेत आपली मदत मोठी असून निस्वार्थीमनाने आपले पाऊल जनसामान्यांचे पडले असून आपले योगदान अमुल्य ठरले असून अशा दातृत्वाचा सलाम केल्याने त्यांच्या निर्भिड आणि निस्वार्थी कामगिरीचा अनुभव असल्याने आमच्या संस्थेमार्फत सन्मान करण्यात आले असल्याचे या ग्रीन फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अमित जगताप यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

No comments