0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- खोपोली |
खोपोलीतील इंडिया स्टील कपंनीमध्ये मध्यरात्री स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिनेश वामनराव चव्हाण (वय 55) आणि प्रमोद दूधनाथ शर्मा (वय 30, दोन्ही रा. खोपोली) अशी मृतांची नावे आहेत. तर, सुभाष धोंडीबा वांजळे (वय 55) हे गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप या स्फोटाचे कारण समजले नाही.ही कंपनी शहरी भागातील वस्तीजवळ आहे. परिणामी या स्फोटामुळे येथील घरांना जोरदार हादरे बसले. या स्फोटाबाबत व्यवस्थापनाकडून काहीही खुलासा करण्यात आलेला नाही.दरम्यान, या अगोदरही या कारखान्यामध्ये स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. आजच्या या स्फोटामुळे एक किमी परिसरात मोठा आवाज ऐकू आला.

Post a comment

 
Top