देवा ग्रुप फाऊंडेशनचे धडाडी पाऊल पडणार पुन्हा गाजवणार महाराष्ट्र ; देवा ग्रुप फाऊंडेशन कामगार संघटना पुणे जिल्हयाच्या वतीने सॅनिटायझर फवारणी,मास्कचे,पी.पी.किटचे वाटप
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोरोना प्रादुर्भाव असताना आपल्या जीवाची पर्वा न करता संपुर्ण
महाराष्ट्रात कोरोना योध्दा भुमिका साकारणार्या देवा ग्रुप फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांनी
धडाडी पाऊल उचलून तळागळात जाऊन कोरोनावर मात करण्याची जनजागृती करून धान्याचे वाटप,अत्यावश्यक
भाजीपाला, फळे,सॅनिटायझर फवारणी तसेच मास्कचे वाटप करून आजही देवा ग्रुप फाऊंडेशन सावली
म्हणून गोरगरिबांच्या मागे उभे आहे हे सिध्द केले आहे.या सर्व सामाजिक कार्याचा वारसा
देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ ढोले,महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तसेच
देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या प्रेरणेतून सर्व पदाधिकार्यांना
मिळाल्याने आजच्या घडीला धडाडी पाऊल पडले असून भविष्यातही देवा ग्रुप फाऊंडेशन हा गाजणार
हे निश्चितच आहे.तेव्हा ही देवा ग्रुप फाऊंडेशनला तोड नव्हता आणि आजही नाही त्यामुळे
एक कोरोना महाराष्ट्रात हाहाकार माजवत जरी असला तरी देवा ग्रुप फाऊंडेशन त्या कोरोनाच्या
विळाख्यात सापडणार्यांना कुटूंबाचे सदस्य म्हणून सदैव सोबत राहून कोरोनाला हरवणार
असल्याचे सर्वत्र पदाधिकारी यांचेकडून बोलले जात आहे.जिथं अंधार असतो तिथं प्रकाशजोत
उगवतेच तसेच जिथं देवा ग्रुप फाऊंडेशन आहे तिथं गरिबांना मदत नक्कीच होते.देवा ग्रुप
फाऊंडेशन सर्वत्र महाराष्ट्रात नामांकित झाले असून या देवा ग्रुप फाऊंडेशनला कुठंच
तोड नाही कारण माणसाच्या मनात घर करणं सोपं नाही आणि ते घर निर्माण केलं केवळ देवा
ग्रुप फाऊंडेशनने.त्यामुळे या फाऊंडेशनचा पाया रचनाणारे देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष
सुजितशेठ ढोले,महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तसेच देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ
मोरे यांना समाजातील प्रत्येक घटकांतून जनसामान्यांचा आशिर्वाद मिळत आहे.
-------------------------------------------
देवा
ग्रुप फाऊंडेशन कामगार संघटना पुणे जिल्हयाच्या वतीने सॅनिटायझर फवारणी,
मास्कचे,पी.पी.किटचे
वाटप
देवा ग्रुप फाऊंडेशन
कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने म्हाळूंगे पोलिस ठाणे येथे देवा ग्रुप
फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वतीने
सॅनिटायझर फवारणी,मास्कचे,पी.पी.किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी देवा ग्रुप फाउंडेशन
कामगार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पै.देवा पुंडे,उपाध्यक्ष पै.सचिन पुंडे व खेड तालुका
उपाध्यक्ष पै.रविंद्र भाऊ शिंदे यांनी हा उपक्रम योजिला होता.या उपक्रमामुळे पोलिस
ठाण्यासह संपुर्ण जिल्हयात देवा ग्रुप फाऊंडेशन हा कर्तव्यदक्ष भुमिका साकारून जनसामान्यांच्या
विचारांची व त्यांच्या काळजीची दखल घेत असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे.त्यामुळे पुणे
जिल्हाध्यक्ष पै.देवा पुंडे,उपाध्यक्ष पै.सचिन पुंडे व खेड तालुका उपाध्यक्ष पै.रविंद्र
भाऊ शिंदे यांच्या कार्याला सर्वत्र कोरोना योध्दा म्हणून त्यांचे आभार व्यक्त करित
आहे.
-------------------------------------------
No comments