web-ads-yml-728x90

Breaking News

शाळा बंद… पण शिक्षण आहे

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.प्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसून यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.


No comments