0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव - बारामती |
बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत त्यांनी कामाचा आढावा घेतला.यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, आदी उपस्थित होते.या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता , बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढविण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहाणी केली.

Post a comment

 
Top