0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- पनवेल |

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य या अराजकीय सामाजिक संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांचा वाढदिवस मास्कचे वाटप करुन साजरा करण्यात आला.

  जागतिक समस्या बनलेल्या कोरोना महामारी या जागतिक संकटाची पाश्र्वभूमी लक्षात घेता  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने येणा-या संकटावर मात करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना व वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. आणि आपले सामाजिक दायित्व राखत अनेक सामाजिक संस्था संघटना देखील शासनाच्या नियमांचे पालन करून त्यांना व समाजाला मदत करीत आहेत.अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य ही देखील सामाजिक दायित्व जपणारी व कर्तव्य पार पाडणारी एक संघटना. या संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके या आपल्या युवा नेत्याचा वाढदिवस स्थानिक कार्यकर्त्यांनी कापडी मास्कचे वाटप करुन साजरा केला.या वेळी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील सर्व वैद्यकीय स्टाफ व गरजु रुग्णांसाठी कापडी मास्क रुग्णालयाचे डॉ. एमपल्ले यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले. सदर प्रसंगी रुग्णालयातील नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांशह प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते सुनील शिरिषकर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या उपस्थितीत टेंभोडे गाव, नवीन पनवेल, सुकापुर ते वाजेरोड या परीसरातील नागरिकांना जवळपास पाचहजार कापडी मास्कचे वाटप कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्त बद्ध पध्दतीने व शासकीय नियमांचे पालन करून केले.

      संतोष चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्तुत्य कार्यक्रमास पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण डायरी वृत्तपत्राचे संपादक व भाजपा अल्पसंख्यांक सेल प्रदेश प्रवक्ते अकबर सय्यद, संपादक व पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनावणे या मान्यवरांनी भेट देऊन संतोष चाळके यांस सुभेच्छा दिल्या. तसेच सागर शिंदे (कल्याण) राज भोईर,राकेश हरकुळकर, परेश लोंढे, राहुल गायकवाड, सुयोग गडगे, परेश भोईर, कुणाल भोईर, अजय पाटील, ऋषी म्हात्रे निलेश शिरसाठ इत्यादी कार्यकर्त्यासह चिंतामणी गृप यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 


Post a comment

 
Top