web-ads-yml-728x90

Breaking News

समस्याग्रस्त मुरबाड तालुक्याच्या दैन्या अवस्थेला श्रेय राजकाराणाची ओढ ; भ्रष्टाचाराच्या तलाव्यात सरकारी मासे


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
हजारो कोटी विकास हरवलेला मुरबाड तालुका आपत्कालीन परिस्थितीत प्रचंड  समस्याग्रस्त बनला आहे.गावाच्या वेशीपासून मतदार संघाच्या खळयापर्यंत नुसते बुजगावणं दिसत आहेत.पिक मात्र नापीक झालं आहे.
          दरवर्षी भ्रष्टाचाराच्या तलावात सरकारी मासे विकासाचे दाणे खात होते त्या माशाची गाबुळी खाणारे पदकारी  भाषणाळू,श्रेयमित्र,ठेकेदार भावकी,लोकांचे प्रतिनिधी आजच्या जीवन मरणाच्या यतनातही श्रेय राजकाराणांची औढताढ करून आपल्या शेतांना पिक कसे येर्इल याकडे पाहत  असून बुडत्या भ्रष्टाचार जहाजात जाळे टाकून मासेमारी करत आहेत.गरीबांचे गहू तांदुळ डाळ सरकारी माश्यांच्या पोटात टाकून आरोग्याचे औषधे पिणारे गरीबांच्या टाळूवरचे लोणी खात असताना कोणी बोलत नाही अशी मुरबाड तालुक्याची दैना अवस्था झाली आहे.हाच प्रकार ठाणे जिल्हयात सर्वत्र सुरू असुन एकामेकां साहय करू दोघे खावू वाटून अशा भ्रष्टाचाराकडे सत्ताधारी विरोधी नेते गांभीर्यताने पहात नाहीत दोषींची चौकशी करून कारवार्इ करत नाहीत.मुरबाड तालुक्यात यावर्षी पाणीपुरवठा सिंचन शेती रोजगार हमी रस्ते पुल आरोग्य सोयी सुविधा शिक्षण प्रकल्पग्रस्त विद्युत स्वच्छता अशा अनेक विकास कामाकडे पाठ फिरवली कामे झाली नाहीत मात्र अनेक शासकीय विभागात कामाची बिले काढली जातील अशा भ्रष्टाचाराची ओरड करणार कोण येथे सत्ताधारी विरोधी दोन्ही एकामेकांसहाय्य करू भ्रष्टाचार दडपू समस्याना तिलांजली देवू मात्र श्रेयासाठी भांडू असा प्रकार करत आहेत.हेच सामान्याचं दुदैव आहे.मुरबाड पंचायत समितीच्या जिल्हापरिषद बांधकाम पाणीपुरवठा,कृषी आरोग्य, ग्रामविकास रोजगार हमी अशा सर्वच विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे.रस्ते,शाळा, अंगणवाडया,शौचालय,तलावगाळ काढणे अनेक ठेकेदारी कामे बोगस करून निधी हडप केला आहे.त्याकडे महाविकास अघाडीच्या मंञ्यानी दुर्लक्ष करून सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी ठेकेदार यांनी प्रचंड गैरव्यवहार केला आहे त्यांची चौकशी सरकारने करायला हवी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.ठाणे जिल्हयात भाजपा महाविकास अघाडी यांचेच ठेकेदारी दगडखाणी अवैध रेती,माती,रेशनिंग दुकाने असुन सामान्य जनतेला वेठीस धरले आहे.दोद्यांचाही दबंगशाही,दादागिरी सामान्यांना तक्रारी करून देत नाहीत,माहिती अधिकारात माहिती देत नाहीत,तक्रारीकडे दुर्लक्ष करून अधिकारी सामान्यांची बाजु घेत नाहीत,निर्णय देत नाहीत,कामे करत नाहीत,लोकप्रतिनिधीच्या तालावर चालतात शासनाचा निधी हाडप करतात याकडे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालून कारवार्इ करावी अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होते तेव्हाही हेच मंत्री होते त्याकालावधीत प्रचंड भ्रष्टाचार झाला कारवार्इ शुन्य पक्ष जोपासला कार्यकर्त्याला बळ दिले त्यातील हेच सत्ता गेल्यावर भाजपात गेले तेथेही तेच केले आता शिवसेनेत भाजपात गेलेले त्याच पध्दतीने वागतात त्याकडे सर्वच नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने मुरबाड मतदार संघात सामान्याना वाली कोणी राहिला नाही एकमेव नेहमी अपेक्षा करणारे नेतृत्व उध्दवजी ठाकरे होते त्यांनाही मुख्यमंत्री केल्याने त्यांच्याकडुन कारवार्इ चौकशी होत नसल्याने ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात मुरबाड मतदार संघात,भिवंडी,शहापूर,कल्याण ग्रामीण भागात कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे.मात्र,सामान्यांना कोरोनाच्या भितीत बंधिस्त करून सत्ताधारी विरोधीपक्ष ठेकेदारी रेशनिंग सर्व विभागात भ्रष्टाचाराला बळ देत आहेत.शासनाने आरोग्य,साहित्य,औषधे उपचार इमारती दुरूस्ती तसेच सार्वजनिक विभागाचे रस्ते इमारती अन्य कामे पंचायत समिती,जिल्हापरिषद,कृषी,आरोग्य,ग्रामविकास,नॅशनल हायवे,वनविभाग यांच्या कामांची त्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी. 

No comments