web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयाची काळजी घेणारा फक्त एकच नेता - आ.किसन कथोरे...


BY - मिलींद दळवी, युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
आत्तापर्यंत फार नौटंकीबाज नेते,मंत्री पाहिले,प्रशासकाच्या तालावर नाचणारे सुध्दा काही पाहिले मात्र,खरच आदिवासी गोरगरिबांची काळजी करणारा चांगल्याला चांगला अन वार्इटाला वार्इट प्रशासनावर पकड असणारा तेवढाच बहुजन सुधारक सर्वांची काळजी घेऊन सत्य समोर मांडणारा लोकाभिमुख नेता तथा आमदार किसन कथोरे फक्तएकच कोरोना कालावधीत पाहिला.
          गेल्या 40 वर्षाच्या कालावधीत  .किसन कथोरे यांच्या  कार्याची  समाजप्रबोधन  पध्दत सार्या महाराष्ट्रानी पाहिली.ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषद,आमदारकी,कोकण विकास पाठबंधारे उपाध्यक्ष तर आजही 1 लाख 70 हजाराने निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांची  निर्भिडता,सत्यता बाजुला गेली नाही त्यांना नौटंकी पसंत नाही,सत्य तेच सत्य,चांगुलगिरी प्रसिध्दीने कमविलेल्या श्रोत्यांना त्यांनी कधीही योध्दा मानला नाही.संकट समयी साम,दाम,दंड,भेदाची भुमिका गेल्या 40 वर्षात घेतली.आज महाभयानक कोरोना महामारीत आमदार किसन कथोरे यांची  भुमिका निर्णायक ठरली आहे.
          तु जग तुझी मला गरज आहे असं इतरांसारखे राजकारण उधारीचे केले नाही.आमदार किसन कथोरे यांनी कोरोना कालावधीत प्रथम गोरगरिब आदिवासी पासून आडल्या नडल्यांना संपुर्ण ठाणे जिल्हयात आणि महाराष्ट्रात अन्नधान्य प्रवास वाहतुकीची मदत केली.आपले शेकडो चाहते कार्यकर्ते कामाला लावले.रोजचा फिरता द्वौरा केला,प्रशासनाला लोकांवर अन्याय नको अशी सक्त ताकीद देवून अवैध धंद्दयांना अपप्रवृत्तीला चाप दिला.
          लॉकडाऊन वाढत गेले,दोन्ही सरकार पुढे एक आमदार काय करणार म्हणून त्यांनी आपल्या पक्षाच्या केंद्रीय योजनांचा लाभ लाभार्थींना मिळवून दिला त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.कालांतराने लॉकडाऊन वाढत गेले.रिक्षावाला,छोटे व्यवसायीक कामगार भयभीत झाले,त्यावेळी पुन्हा आमदार किसन कथोरे पुढे आले त्यांनी मुरबाडमध्ये प्रथम रिक्षा तसेच बाजारपेठा सुरू केल्या.गेली 3 महिने मुरबाडमध्ये एकही कोरोनाचा रूग्ण नव्हता.त्यांच्या ग्रामीण भागात एकही कोरोना रूग्ण निर्माण झाला नाही.एवढी जबाबदारी आणि खबरदारी दोन्ही सांभाळल्या तेव्हापासून मुरबाड मतदार संघाचा पालकत्व आणि आमदार दोन्ही बाजू सांभाळल्या.
          ठाणे जिल्हयातील ग्रामीण रूग्णांना शहरी भागात ठाणे,मुंबर्इ,उल्हासनगर,कल्याणच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेत नव्हते त्यावेळी ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील रूग्णांना उपचार दिला नाही तर तुमचा पाणी तोडू असा गंभीर इशारा देणारा एकच कोरोना योध्दाचा मायबाप आमदार किसन कथोरे आहेत.
          अनेक लोक,लोकप्रतिनिधी म्हणून टिका करतात,कमेंट करतात,घरातूनच बोलतात आणि सत्य बाजु मांडतो मात्र,कथोरेच्या विरोधकांना नव्हे आमच्या रस्त्यावर कमेंट टाकून स्वताच धुर काढून घेणार्या आवळाद्दया सुध्दा आहेत.जेव्हा आम्ही  पत्रकार बोंबाललो तेव्हा मदतीला धावला  नाही तोसुध्दा कमेंट करेल आम्ही सामान्यांच वाचकाचं मित्र  आहोत त्याचप्रमाणे  देशात  राज्यात प्रथम पत्रकारांचे नाव  घेऊन पत्रकारांना मदत केली.पत्रकार  विम्यापर्यंत  पोहोचला,पत्रकारांची खरी काळजी घेतली आमदार किसन कथोरे यांनी.म्हणून आम्हाला सत्य लिहावे लागले,उद्दया कोणी बोलले तुम्ही पत्रकार आहात आमचंही छापा पण तेव्हा तु कुठे होता,माझ्या पत्रकारिता कुटूंबाच्या मदतीला गरज  होती त्यामुळे पत्रकारांनी सुध्दा ज्यांनी मदत केली त्यांची सत्यता मांडायला विसरू नये आणि शेंबडयांनी कमेट करू नये हे मुद्दामच
          आमदार किसन कथोरे यांनी ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात सरकारापेक्षा अधिक काळजी घेतली.त्यांनी रूग्णांना उपचार केंद्र उभे करून दिले,डॉक्टर सेवा दिली.माझा ग्रामीण माणूस शहरात उपचारासाठी गेल्यावर त्वरीत उपचार व्हावे म्हणून त्यांची जबाबदारी आज कोरोनामध्ये पार पडली.एवढा मोठा आधार केवळ आमदार किसन कथोरे यांच्यामुळे ग्रामीण भागाला लाभला आहे.भिवंडी ग्रामीण,शहापूर,कल्याण,मुरबाड,अंबरनाथ,बदलापूर परिसरातीलआरोग्य यंत्रणा सुसज्ज करून भविष्यात आरोग्य यंत्रणा कायम स्वरूपी लोकांना मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.बोगस डॉक्टर त्याचप्रमाणे रूग्णांची लुटमार करणार्या डॉक्टरावर त्यांनी राग व्यक्त केला.औषधाचा काळाबाजार करणार्या मेडीकलवर संताप व्यक्त केला.अफवांना बाजुला सारवून माझा ग्रामीण शेतकरी,कष्टकरी कामगार,व्यापारी यांच्यासाठी बाजारपेठा सुरू करून आरोग्याची काळजी घेतली तेथे एकच फक्त आमदार किसन कथोरे.सरकार दुसरे कोणी नाही असा एकत्र महायोध्दा म्हणजे आमदार किसन कथोरे.


No comments