web-ads-yml-728x90

Breaking News

डॉ.जितेंद्र बेंढारी,डॉ.महेंद्र बेढांरी मुरबाडचे कोरोना योध्दा


BY -  कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाड तालुक्यात कोरोनाचा आकडा समोर येत असतांना भयानक अशा कोरोनाच्या प्रादुर्भावात 24 तास नागरिकांच्या सेवेसी तप्तर असणारे नामांकित अनुभवी डॉक्टर डॉ.जितेंद्र बेंढारी, डॉ.महेंद्र बेढांरी हे कोरोना योध्दा म्हणून आपली भुमिका बजावत आहेत.कोणाचा काही भरवसा नसतांना आपण आपण आपली काळजी घ्यावी असे वारंवार नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांना विविध आजारावर मात करण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे.मुरबाड मध्ये काही खाजगी दवाखाने दुपारपर्यंत चालू असतात परंतू मोजकेच दवाखाने सोडले तर अन्य दवाखाने हे कोरोना योध्दा म्हणून कार्य करत आहेत.काही डॉक्टरांनी तर यामध्ये नागरिकांना वाचविण्यात आपली शक्ती पणाला लावली आहे.त्यामध्ये मुरबाड डॉ.जितेंद्र बेंढारी, डॉ.महेंद्र बेढांरी यांचे नाव सध्या चर्चेत आहेत.सध्या गर्भवती महिलांना काळजी घेण्याची अवश्यक्यता असतांना डॉ.जितेंद्र बेंढारी हे त्यांच्या सेवेसी असल्याने महिलांच्या प्रसुतीविषयी प्रश्‍न गंभीर आता राहिला नाही त्यामुळे डॉ.जितेंद्र बेंढारी,डॉ.महेंद्र बेढांरी हे सध्याच्या परिस्थितीतही कोरोना योध्दा म्हणून सामाजिक कार्य करतांना दिसत आहेत.रात्र असो किंवा दिवस डॉ.जितेंद्र बेंढारी,डॉ.महेंद्र बेढांरी हे सदैव नागरिकांच्या मदतीला धाऊन येत असून आता दैवरूप म्हणून सध्या त्यांच्या कार्यात दिसून येत असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांच्या गंभीर आजारावर त्यांचे उपचार आणि रोगाचे निदान कळताच वेळीच उपचार केले जात आहे त्यामुळे अशा डॉक्टरांचे कौतूक होत आहेत.

No comments