0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
मुरबाड तालुक्यात गुटखा मटका व मन्नुभार्इची बनावटी दारू लॉकडाऊनमध्ये चांगलीच चाप बसली असून या चापचा फटका संबंधित हप्तेखोर करणारे अधिकारी यांना बसला आहे.वेळोवेळी आम्ही उघड सत्य मांडत असतो आणि त्यावर कारवार्इ करण्याएैवजी हप्तेबाजीचा सुर मात्र संबंधित अधिकारी यांना उठवायचे परंतू एक लॉकडाऊन शब्द आणि कोरोनाच्या भितीमुळे मटका,जुगार,आकडा,दारू धंदयावाल्यांचा बेकायदेशीर चोरीछुप्पे धंदा मात्र ढिल्ला पडला याचा फटका त्यांच्या गल्ल्याला व हप्ता घेणार्‍या अधिकार्‍याला बसला आहे.मटका आकडा हा लॉकडाऊन निर्गमित करण्यासारखा झाला आहे कारण जसे लॉकडाऊन काही कालावधीसाठी निर्गमित करतात तेव्हा आकडा,जुगार,दारू धंदा,गुटखाही निर्गमितपणे कोरोनाच्या प्रादुर्भावातून खुले होतात याच लॉकडाऊनमध्ये याच बेकायदेशीर धंद्दयांनी वाव घेतला असता तिजोरीत पैसा आणि हप्तेखोरांची मज्जा होती परंतू सध्याच्या परिस्थिती पाहता सोमे गोमे,खरे खोटे रोठे,हे मोठे न होता घरातच बसुन आहे.आकडे लावायचे झालेच तर घरून आकडा लावतात,गुटखा पाहिजे असल्यास घरात मिळतो,दारू पाहिजे असल्यास इमारतीच्या टॅरेजवर भेटते,रूममध्ये बेटींग,गुटखा गाडी रात्री खोली होते,जुगाराचा धंदा तेजीत,त्यात मन्नुभार्इची दारू बेकायदेशीर आणि बनावटी इत्यांदीवर पोलिस प्रशासनाचा वचक हा राहिला नसून कोरोनामध्ये सध्या  व्यस्त झाले आहेत.याचा फायदा घेतला जातो  कि नजर फिरवली जाते याचा अभ्यास मात्र गुलदस्त्यात डांबून ठेवला आहे.कोणाकडे पाहावे आणि कोणाकडे वळावे अशी परिस्थिती हप्तेखोरांसमोर आज उपस्थित झाली आहे.अलीकडे एकाद्दयाला पकडला कि आर्इ शप्पथ साहेब मी नव्हतो,हा शब्द अलीकडे खुप गाजत आहे त्यामुळे साहेब साटेलोटे  करून गरिब बेकायदेशीर धंदेवाल्यांवर दया करतो आणि पुढिल वाटचालीस महिना हप्ता लावून शुभेच्छा देतो.यामुळे विविध स्तरातील दोन नंबरी धंदेवाले यांनी आपले डोके वर काढले आहे.कोणतीही तक्रार गोपिनिय झाली की,धंद्दयावाल्याला कळते कशी आणि तात्काळ तो धंदेवाला धंदा काही कालावधीपुरता बंद करतो तसेच रेट मारून झाली की जैसे थे वैसे ही अवस्था नाही ही पध्दत मुरबाड तालुक्यात निर्माण झाली आहे.दोन नंबरीवाल्यांचा धंदा छुप्पे पध्दतीने असून चोरी-चोरी,छुपके-छुपके प्रकार घडत आहे.परंतु अशा आकडा,जुगार,दारू धंदा,गुटख्या डिलरवर अद्दयापही कारवार्इ झालेली नाही.जी कारवार्इ करण्यात आली ती बेकायदेशीर दारू विक्रीवर केली आहे परंतू आकडा,जुगार,गुटख्यावाल्यांचा काय ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
          खालपासून वरपर्यंत अधिकारी बांधले गेले आहेत त्यामुळे सध्याची परिस्थिती कोरोनावर चालढकल करून मुरबाड तालुक्यात विविध बेकायदेशीर धंदे चालू असून त्यांना हप्तेखोर अधिकारी कवच बनले आहेत.मन्नुभार्इच्या बनावटी दारूवर अधिकारी मॅनेज झाले व मन्नुभार्इचा राजकारणी भागिदारी  नेता साहेबांचा समर्थक म्हणून काम पाहू लागला,आकडेवारीचा धंदा चार दुकानात चालू झाला,गुटख्यावर बंदी असताना गुटखा विक्री सर्रास चालू,जुगारावर पुढारगरी करणारे मालक म्हणून वावरू लागले,अशा खुणा समोर असताना प्रशासक गाफील राहून हप्तेखोरांना पाठिशी घालून त्यांना वाचवण्याचा कारनामा करत आहेत.दो हंसो की जोडी असलेले मन्नुभार्इ आणि साहेबांचा समर्थक आता तर कोरोनाच्या भितीने न आल्याने मुरबाड मधील 50 टक्के बेकायदेशीर बनावटी दारू विक्री बंद झाले आहे.त्यामुळे रहदारीच्या रस्त्यात आणि मुरबाड नगरपंचायतीच्या इमारतीखाली मन्नुभार्इला ठेवू नयेत म्हणून मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.त्यामुळे आता मुरबाडमधील प्रशासक कोरोनाकडे वळून राहिले असता या दोन नंबरी धंद्दयाकडे कोण लक्ष घालणार असा प्रश्‍न एैरणीवर आला आहे.


Post a comment

 
Top