web-ads-yml-728x90

Breaking News

जुलै महिन्यात आतापर्यंत २५ लाख ७२ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ


BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यातील 52 हजार 436 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 20 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 13 लाख 73 हजार 331 शिधापत्रिका धारकांना 25 लाख 72 हजार 109 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 436 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 14 लाख 4 हजार 481 क्विंटल गहू, 10 लाख 77 हजार 606 क्विंटल तांदूळ, तर 14 हजार 715 क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 2 लाख 51 हजार 897 शिधापत्रिका धारकांनी  ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो (गहू + तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. दि. 15 जुलै पासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण 4 लाख 10 हजार 978 रेशनकार्ड ला मोफत (गहू + तांदूळ) वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 18 लाख 446 लोकसंख्येला 90 हजार 22 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 40 लाख 18 हजार 760 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 33 लाख 92 हजार 65 लोकसंख्येला 31 लाख 69 हजार 603 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.  राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 76 हजार 098 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे. 

No comments