web-ads-yml-728x90

Breaking News

महिलांची सुरक्षा वार्‍यावर; घाटरस्त्यावर झाला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; त्या बेजबाबदार सहाय्यक पोलिस निरिक्षकाला बडतर्फ करा - महिलांची मुख्यमंञ्यांकडे मांगणी


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या मोरोशी गांवा जवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास एका मोटारसायकलवरून जात असलेल्या तरूण व अल्पवयीन मुलीला अडवीले तरूणाला बेदम मारहाण करून एका बाजूच्या झाडाला बांधले नंतर त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार टोकावडे हद्दीतील मोरोशी येथे घटना घडली.सदर प्रकरणी चार आरोपी आवळीची वाडी येथे राहणारे असून त्यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचे वृत्त समोर येते आहे.सदर आरोपीतानी त्या अल्पवयीन मुलीला झाडीझुडपात नेवून सामुहिक विनयभंग केला.तरूणाने कशीबशी सुटका करून मोरोशी गांवात धाव घेतली व सदरील प्रकार गावकर्‍यांना सांगितले.तेव्हा गावकरी घटनास्थळे गेले असता त्यांना ती मुलगी निर्वस्त्र अवस्थेत आढळून आली.सदरचे प्रकरण कोरोना कालावधीत कर्तव्यपरायण भुमिकेमध्ये असलेल्या पोलिस सहाय्यक निरिक्षक टोकावडे यांच्या बंदोबस्तामध्ये घडुन आल्याने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्‍न उदभवल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.एक दिवसाआगोदर चार गाडया अडवून परत मार्गी जाण्याची शो शार्इनिंगपणा बंदोबस्त ठिकाणी असलेल्या पोलिसांनी प्रसिध्दी मिळवण्यासाठी केला असून सदरचे युवक युवती हे प्रतिबंधात्मक ठिकाणी पोहोचले कसे? पर्यटनस्थळी पर्यटक धिंगाना करतात दारूडे महिलांची छेडछाणी करतात दारूडयांच्या पाटर्याहोतात तेव्हा पोलिस यंत्रणा आपली कोणती जबाबदारी संभाळत असते असे अनेक प्रश्‍न समोर येत असल्याने विनंयभंगाबरोबर अनेक घटना झाडाझुडपात घडल्या असतील व कदाचित असे अनेक प्रकरणे दाबले असतील याचा विचार ही आता करता येणार नाही.त्यामुळे अशा बेफिकीर बेजबाबदारी अतिशहाण्या समजणार्‍या तसेच महिलांच्या सुरक्षा वार्‍यावर सोडणार्‍या त्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाला बडतर्फ करा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री ,गृहमंत्री,पोलिस महासंचालक यांच्याकडे महिलावर्गानी केली आहे.

No comments