0

BY - अज्ञानसिंग चव्हाण,युवा महाराष्ट्र लाइव- उरण |
सोयगांव तालुक्यातिल सर्वात टोकाचे सावळदबारा हे गांव अति दुर्गम व डोगंरी भाग आहे या वर्षि सावळदबारा सर्कल मध्ये 50 टक्के शेतकरी दुबार ते तिबार पेरनी झाली आहे. शेतकरी राजा हतबल झाला आहे. सावळदबारा येथील शेतकरी  कैलास सुर्यभान शिप्पलकर वय 32 वर्ष यांना दोन भाऊ असून मोठा भाऊ प्रकाश सूर्यभान शिप्पलकर व मधला भाऊ बाबू सुर्यमान शिप्पलकर असून वडील मयत झालेले आहे व आई अहिल्याबाई सूर्यभान शिप्पलकर यांना दीड एकर जमीन सावळदबारा शिवार गट नंबर 123 हा असून यावर्षी मयत कैलास शिप्पलकर शेती बघत होते यावर्षी दुबार पेरणी करूनही  शेत उगवले नाही  व शेतीसाठी  l.t. फायनान्स जामनेर  येथून रोख रक्कम तीस हजार रुपये घेतले होते व ग्रामीण कुटा भुसावल येथून रोख रक्कम 75000 व तसेच खाजगी 50 हजार रुपये अशी एकूण एक लाख 55 हजार रुपये कर्ज असल्याने शेतात पेरलेले पीक वाया गेल्याने घेतलेले कर्ज कसं खेळावर अशी चिंता ग्रस्त असायचा व सारखी काळजी करत असायचा काल दिनांक 16 जुलै 2020 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माझा मयत भाऊ कैलास शिप्पलकर हा शेतात जातो म्हणून घरी सांगून गेला त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास मयत भाऊ कैलास यांनी फोनवर माहिती दिली की मी सावळतबारा शिवारात जंगलात कर्जाला कंटाळून फाशी घेत आहे तू माझ्या मुलीकडे व पत्नीकडे लक्ष दे असे सांगून फोन ठेवून दिला व त्यानंतर गावातील लोक व मयता चे भाऊ शोध घेण्यासाठी जंगलाकडे गेले असता प्रेत सागाच्या झाडाला दोरीने प्रेत आढळून आले गावकऱ्यांच्या साह्याने प्रेती खाली उतरून प्राथमिक आरोग्य केंद्र सावळदबारा येथे आणून पी एम  करण्यात आले तरी मयत कैलास शिप्पलकर कर्जाला कंटाळून जीवन संपले व पुढील तपास पोलीस जमादार मोरे, व पोलीस नाईक ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल बागुल कर, हे करत आहे

Post a Comment

 
Top