0

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटानजीक नादुरुस्त कंटेनरवर दुसरा कंटेनर धडकून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात नादुरुस्त कंटेनर दुरुस्त करणारे 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सभरसिंग राठी, मोहमद इर्शाद आणि अन्य एक अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. अशातच सोमवारी असतानाच शनिवारी संध्याकाळच्या सुमाराला ही घटना घडली. मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटाजवळ एक कंटनेर (क्र. एमएच 04.एफबी. 0148) नादुरुस्त असल्याने उभा होता. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर (क्र. एमएच 43.बीपी. 5714) या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव कंटेनर उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, कसारा पोलीस, महामार्ग पोलीस, घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी काही वाहन चालकांच्या मदतीने अडकलेल्या चालकास बाहेर काढले. कसारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

Post a comment

 
Top