0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नागपूर |
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला आज 28 दिवसांचा फरलो मंजूर केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करून नागपूर कारागृहात परतला होता. फरलो रजा मिळावी म्हणून 30 नोव्हेंबर 2019 ला गवळीने तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता परंतु 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचा अर्जावर सुनावणी झाली नाही. सोबतच अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला, परंतु दिलेल्या मुदतीत त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही.
दिलेल्या कालावधीत तो तुरुंगात हजर झाल्याचा युक्तिवाद गवळीच्या वकिलांनी केला आहे. वकिलाचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे अरुण गवळीचा पॅरोल एकदा वाढवण्यात देखील आला होता. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या खुनाच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

Post a comment

 
Top