0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी मुंबई |
नवी मुंबईत तब्बल 178 रुग्ण आढळले आहे. त्यामुळं कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 हजार 605 वर गेली आहे. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 211 झाला आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर 21, नेरुळ 20 , वाशी 13, तुर्भे 04, कोपरखैरणे 22, घणसोली 29 , ऐरोली 52, दिघा 17 रुग्णांचा समावेश आहेत.दरम्यान 122 जणांनी कोरोनावर मात केली असल्यानं कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 754 झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. 

Post a comment

 
Top