web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण, वॉर्डबॉय पदासाठी 1500 तरुणांच्या घेतल्या होत्या मुलाखती


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
वेगाने वाढणाऱ्या कोरोनाने बाधित होणाऱ्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यातच आज पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने पालिका वृतळात खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या वॉर्डबॉयच्या पदासाठी काल त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. कधी नव्हे ते या मुलाखती साठी उमेदवारांनी तोबा गर्दी केली होती.तब्बल 1500 उमेदवारांच्या मूलखती घेण्यासाठी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे अनेक कर्मचारी काम करत होते. तर सर्व उमेद्वाराचे अर्ज उपयुक्तांनी स्वत: हाताळल्याने कर्मचाऱ्यासह उमेद्वारांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान उपायुक्ताचा अहवाल पॉझिटिव्ह येताच खबरदारी म्हणून शुक्रवार महापालिका मुख्यालय बंद ठेऊन निर्जंतुकीकरण करण्यस सुरुवात केली आहे.


No comments