औरंगाबादेत 10 जुलै ते 18 जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
BY - युवा महाराष्ट्र लाइव - औरंगाबाद |
मराठवाड्याची राजधानी
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरात 10
जुलै ते 18 जुलै दरम्यान कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत
घेण्यात आला आहे.त्यानुसार आता शहरात 10
जुलैपासून 18 जुलैपर्यंत कडक संचारबंदी असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय
चौधरी यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत कोरोना व्हायरसने मोठे
थैमान घातलं आहेत.
दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 200 ते 250 रुग्णांची वाढ
होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं
प्रशासनासमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला संपुर्ण औरंगाबाद 6 हजार
680 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये 310 जणांचा मृत्यू झाला आहे. याच
पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत 10 जुलैपासून शहर कडकडीत बंद
ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी संचाबंदीचे कडक नियम
पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
No comments