web-ads-yml-728x90

Breaking News

"जातीय अत्याचार घटनांच्या विरोधात" अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे शासनास निवेदन... "


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण |
महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी झालेल्या जातीय अत्याचार घटनांच्या संदर्भात राज्य शासनाने कठोर पावले उचलावीत व उपाययोजना करुन पिडीतांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या व इतर विविध  मागण्यांसंदर्भात "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य." या सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशाने स्थानिक जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांचे मार्फत शासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे अभियान राबविण्यात आले.
यामध्ये अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव, महेंद्र तथा अण्णा पंडित यांचे नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी, कल्याण विभाग यांचे कार्यालयात विषयांकीत निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी त्यांचे सोबत श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आदर्श भालेराव, मासु संघटनेचे राज्य सहसचिव तथा दि शिल्ड या सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रशांत जाधव,कल्याण कोकण न्युज उपसंपादीका सुवर्णा कानवडे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे सागर शिंदे, तेजस शेजवळ इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली नासिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या सोबत प्रदेश कोषाध्यक्ष सचिनदा गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, प्रदिप नाना गांगुर्डे, उपाध्यक्षा, ममता पुणेकर, नासिक शहर अध्यक्षा, राधाताई क्षीरसागर इ. पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई - गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना प्रदेश संघटीका प्रा. अर्चनाताई जागुष्टे यांनी अॅड. मंगेश पवार श्रीमती गवारे यांचे सह शासनास निवेदन सादर केले. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षा, प्रा. प्रेमलता जाधव यांनी आपले सहकारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा, सुनिता सोनार, जिल्हाध्यक्षा, शोभा नगराळे, शहर अध्यक्षा, कविता कोळी, ललीता शिरसाठ, अॅड ठाणगे मॅडम यांचे सह निवेदन सादर केले. पुणे जिल्हाध्यक्षा स्मिता दातीर यांनी सचिन इगवें सह उपस्थित राहून कोंढवा पोलीस ठाण्याचे वपोनी विनायक गायकवाड यांचे मार्फत शासनास निवेदन दिले..तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना जिल्हाध्यक्षा,रमादेवी धिवर यांचे नेतृत्वाखाली तर प्रांत अधिकारी यांना शारदा कदम यांच्या नेतृत्वाखाली अनिता नरोडे, अॅड मिलींद धिवर, सुलताना शेख, शेख अहमद, नासीर मास्टर, अली सय्यद हनीफभभाई पठाण, बालीका मोरे, साखराबाई जोगदंड, संगीता साबळे राजु पवार इ. कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. जळगाव जिल्हा भडगाव तहसील मध्ये जिल्हाध्यक्ष रायसिंग पवार दादाभाऊ बनकर, यशराज निकम, प्रदिप महाजन यांचे हस्ते तहसीलदार सुषमा आंधळे यांनी निवेदन स्विकारलेले. नासिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव,चांदवड,सिन्नर व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी अनुक्रमे राजाभाऊ गांगुर्डे, ता. अध्यक्ष नेहा कोलगे-ढाके, वर्षा आहीरे,चांदवड तालुका अध्यक्षा परविन बागवान, कार्याध्यक्षा मिनाताई शिरसाठ, राजेश पगारे,नासिक जिल्हा सहचिटणीस सचिन बागुल हर्षल लोखंडे, अरविंद शेजवळ यांनी विभागीय महसूल आयुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन दिले दिंडोरी तालुका अध्यक्ष रविराज सोनावणे यांचे नेतृत्वाखाली सलीम शेख प्रविण निकम, मुश्ताक सय्यद, गणेश गवारे, पृथ्वीराज पवार व आदिल शेख यांचे सह तहसीलदार दिंडोरी कार्यालयात निवेदन दिले.

No comments