BY - युवा महाराष्ट्र
लाइव - नांदेड |
आजच्या घडीला जिल्ह्यातील कोवीड -१९ संदर्भातील परिस्थिती
आटोक्यात जरी असली तरी शासन पातळीवर भविष्यातील स्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय
होणार नाही यादृष्टीने जिल्हा पातळीवर शक्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या नियोजन
व पुढील कामांच्या दिशासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली
होती.जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या नेतृत्वाखाली
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा
परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक सुधीर
फडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉ.चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर व इतर विभागांचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.
कोविड -१९ बाधितांवर उपचार
होण्यासाठी खाजगी रुग्णालयांचा शासनाने विचार करुन काही निर्देश दिले होते. जिल्हा
व तालुका पातळीवर असलेले हे खाजगी रुग्णालय आकाराने लहान असल्यामुळे अशा ठिकाणी कोविड-
१९ बाधित व्यक्तींना उपचारासाठी ठेवणे अधिक आव्हानात्मक होईल, असे पालकमंत्री अशोक
चव्हाण यांनी स्पष्ट केले. लहान रुग्णालयांना यात समाविष्ट करण्याऐवजी एखाद्या
मोठ्या जागेवर मोठ्या स्वरुपाचे उपचार केंद्र निर्माण केले आणि त्याठिकाणी खाजगी
वैद्यकीय तज्ज्ञांना गरजेनुरुप जर उपचार देण्यासाठी निमंत्रित केले तर हे सर्वार्थाने
योग्य ठरेल, असे निर्देश त्यांनी देऊन याबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करण्याचे सांगितले.
Post a comment