web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या रेशनिंग घोटाळयात सत्ताधारी,विरोधक लाभार्थी


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाल्याशिवाय राज्यकर्त्यांचे दिवस जात नाहीत तेच तेच चेहरे तोच तोच पक्ष आपआपल्या परिने एकमेकांत  मिळून मिसळून काम करतात फक्त विरोध म्हणून कागदोपत्री ओरड करून लोकांना उल्लू समजतात मात्र,लोक उल्लू नाहीत,बंधिस्त आहेत तोंडावर बोट हातावर घडी यावेळी मात्र,बांधून घरातच कोंबून प्रचंड मोठा रेशनिंग घोटाळा मिळून जुळून महाविकास आघाडीचे सरकार-प्रकाशक-विरोधीपक्षांनी मुरबाडमध्ये केला आहे.
          अधिकार्‍यांना हाताच्या हुगळीवर नाचवून भ्रष्टाचाराला बळ देनारे सत्ताधारी कारवार्इचे आदेश सोडून समाधान करतात परंतू अधिकार्‍यांच्या खोटया आवाहनाने भ्रष्टाचार दडपतात अशा प्रकाराला मुरबाड तहसिलदार कार्यालयात रेशनिंग धान्य,डाळ,साखर,रॉकेल गायब झाले.कार्डधारकांच्या तक्रारी नाहीत म्हणून शासनाला अहवाल पाठवून स्थानिक सत्ताधार्‍यांना हाताशी धरून दुकानदारांना बळ देण्याचा प्रकार मुरबाडला घडला आहे.
          मुरबाडमध्ये रेशनिंग दुकानदारांच काही जण (धान्यटोळी)दुकानातील धान्य जमा करून मुरबाडमधील दुकानातील धान्य खरेदी करून काही रार्इसमिल,पिठाच्या गिरणी,व्यापार्‍यांना काळयाबाजारात विक्री करतात आणि तहसिलदार,जिल्हापुरवठा अधिकारी,मुरबाड पुरवठा अधिकारी लाखोचा मासिक हप्ता घेऊन दुकानदाराला अभय देतात याच टोळक्यांनी कोरोना कालावधीत मार्च,एप्रिल,मे,जून पर्यंतच्या धान्यात काटझाट,कमीप्रमाण,कार्डवाढ,बोगस लाभार्थी तयार करून हजारो किलो धान्य काळयाबाजारात विक्री केले आहे.त्याचप्रमाणे तुरडाळ,चनाडाळ जून महिण्यात वाटप करून दोन महिण्यांची डाळ खाल्ली आहे.साखर,रॉकेल नियमीत धान्य यांच्यातही काळाबाजार झाला त्याची तक्रार आम्ही केली.मुख्यमंञ्यांनी चौकशी गृहमंञ्यांकडे तसेच अन्न पुरवठा विभागाकडे दिली मात्र,चौकशी गुलदस्त्यातच गेली कारण येथे सत्ताधारी काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेनेचा सरकार आणि भाजपा विरोधी पक्षाचे आमदार यांचेच सर्व दुकानदार असल्याने कारवार्इ कोण करणार शिवाय राजकीय कार्यकर्त्यांनीच रेशनिंग धान्य घेऊन वाटप केल्याची चर्चा असल्याने गरिबाचं येथे आवाज दाबला जातोय.भ्रष्टाचार धान्य,डाळ,साखर,रॉकेल गोटाळयाचे समविचारी एकाच माळेचे मणी सत्ताधारी विरोधीपक्ष दोघेही लाभार्थी असल्याचे बोलले जात आहे.


No comments