0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.  कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे,  सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव कृषि एकनाथ डवले, प्रधान सचिव सहकार आभा शुक्ला, प्रधान सचिव पदुम व पणन अनुप कुमार, सचिव, अन्न व नागरी पुरवठा संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक, कापूस उत्पादक महासंघ नवीन सोना,आयुक्त कृषि सुहास दिवसे, व्ववस्थापकीय संचालक, महाबीज उपस्थित होतेयावेळी माहिती देण्यात आली की, खरीप हंगामासाठी ४३.५० लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती त्यापैकी ४० लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय ५० हजार मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top