0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
महानगरपालिका पी- उत्तर विभागामध्ये कंटेन्टमेंट झोन असणाऱ्या ठिकाणी ‘स्क्रिनिंग’ करण्यासाठी डॉक्टर्स व वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या वीस टीम तयार करण्यात आल्या असून प्रत्येक इमारतीत व झोपडपट्ट्यांधील प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.पी-उत्तर विभागात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सहायक मनपा आयुक्त संजोग कबरे, पालिका उपायुक्त रंजित ढाकणे, वैद्यकीय अधिकारी व पालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.श्री.शेख म्हणाले की, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून सहा ते सात वेळा निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कंटेन्टमेंट झोनमध्ये वैद्यकीय शिबीरे घेऊन लोकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. जीवनसत्त्व – सी गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर अशा स्वरुपाच्या केसेमध्ये वाढ होणार हे गृहित धरुन आधीपासूनच विलगिकरण केंद्र व अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्याचे श्री.शेख यांनी सांगितले.

Post a comment

 
Top