0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज  १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८  नमुन्यांपैकी  १ लाख १३ हजार  ४४५  नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८६ हजार  ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Post a comment

 
Top