web-ads-yml-728x90

Breaking News

मालवाहू ‘एस.टी’ ची विश्वासार्ह सेवा; लालपरीचं असंही ‘संजीवन’ रुप


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय लालपरी ‘एस.टी.’ ने आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतली असून विश्वासार्हता आणि सुरक्षितता या द्विसूत्रीमुळे एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी एस.टी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे. २१ मे पासून आजपर्यंत मालवाहतूक एस.टीने ५४३ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली असून त्यासाठी ९० हजार कि.मीचा प्रवास करून  त्यापोटी महामंडळाला २१ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास महामंडळाने मान्यता दिली असून आतापर्यंत ७२  बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरित) कार्यरत असून आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

No comments