BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोविड-१९ रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून
पोर्टलवर भरण्यात येते. या माहितीत पारदर्शकता असावी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल
यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही
व्हावी अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रारंभीपासून दिली असून त्यानुसारच
हे समायोजन करण्यात आले आहे. शिवाय यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी म्हणून या माहितीचे
समायोजन नियमितपणे केले जाणार आहे. यापूर्वी देखील दुबार नावे वगळण्याची कार्यवाही
झाली होती.१३ जून रोजीच सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात त्यांच्या
त्यांच्या अखत्यारीतील प्रयोगशाळांकडून अद्ययावत माहिती घेण्यास व ती भरण्यास सांगितले
होते, त्यानुसार फेरतपासणी करून समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात
येत आहे.
Post a comment