web-ads-yml-728x90

Breaking News

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २५ हजारांहून अधिक प्रवासी मुंबईत!


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर २५ हजार ६२० प्रवाशांचे आगमन झाले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या  ९ हजार ३९१ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी ८ हजार ५७६ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७ हजार ६५३ आहे.हे प्रवासी १६६ विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत.  १ जुलै २०२० पर्यंत  फेज ३ च्या उर्वरित १५ तसेच फेज ४ च्या २१ अशा एकूण ३६ विमानातून प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.


No comments