web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड काँगे्रस भवन समोरील मायरा बेकर्सच्या कारागीरच्या चेहर्‍यावर मास्कचा वापर नाही;बनवलेल्या केक मुळे कोरोनाला आमंत्रण ?


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाड काँगे्रस भवन समोरील मायरा बेकर्सच्या कारागीरच्या चेहर्‍यावर मास्कचा वापर नसून शेकडो लोकांना या कारागीरच्या हाताचा बनवलेला केक शेकडो लोकांना दिला जातो याकडे मालक चालक व संबधीत यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून अशामुळे तो कारागीर शिंकल्यास त्या केक वर उडालेल्या त्याच्या शिंकेने विविध आजार किवा कोरोना आजाराला आमंत्रन दिले जाऊ शकते असे प्रश्‍न सध्या प्रत्येकाला पडला आहे.तसेच येथे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे चित्र दिसत असून सोशल डिस्टन्सिंगचे मात्र येथे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.हे बेकर्स मुरबाड तालुक्यात जनतेची लयलुट करत असल्याचे सुध्दा येथील नागरिक बोलत आहेत.याकडे नगरपंचायत,तहसिल,फुड इन्स्पेक्सन विभाग यांचे दुर्लक्ष झाले असून अशा लॉकडाऊन काळात या दुकानांना कशी परवानगी भेटली व जर भेटली तर तो दुकान कोणत्या वारी चालु ठेवण्यास परवानगी दिली असे तमाम नागरिकांचा सवाल आहे.कारण प्रत्येक दुकानदाराला जर संबधीत यंत्रणा वार ठरवून देत असेल तर हे बेकर्स रोज कसे सुरू असते हा मात्र एक प्रश्‍न चिन्ह आहे.

No comments