0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – बारामती |
‘कोरोना’च्या रुग्णांसह  इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार  मिळण्याची काळजी घ्यावी. ‘कोरोना’च्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.‘कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मूलन आढावा’ आणि ‘विविध विकास कामांची आढावा’ बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.
 

Post a comment

 
Top