web-ads-yml-728x90

Breaking News

जांभिवली ठाकूरपाडा या प्रभागातील आदिवासी भागाकडे अंबरनाथ प्रशासनाचे दुर्लक्ष अन्याय अत्याचार निर्मुलन समिती मैदानात


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अंबरनाथ |
अंबरनाथ शहरात आनंदनगर औद्योगिक क्षेत्राच्या अंतर्गत प्रभाग ५७ जांभिवली ठाकूरपाडा येतो. या पाड्यात एकूण 70 आदिवासी कुटुंब राहतात. या गावाची लोकसंख्या  जेमतेम 280 च्या आसपास आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधी, व आमदार फ़क्त निवडणूका जवळ आल्या की यांची आठवण काढतात. कारण अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित यांनी आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रमुख किशोरी पाटील यांचे समवेत येथे प्रत्यक्ष भेट दिली असता या लोकांची होणारी परवड बघून प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षा कडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.या संदर्भात अंबरनाथ नगरपालिकेचे अति.मुख्याधिकारी डॉ.धीरज चव्हाण यांची प्रत्यक्ष भेटू घेऊन त्यांना आदिवासी वस्ती मध्ये असलेल्या असुविधांची माहिती देण्यात आली. प्रभागातील आदिवासी नागरिकांच्या नित्याच्या रहदारीच्या रस्त्याची झालेली दुर्दशा व शाळेलगत रस्त्यावर असलेला विद्युत महामंडळाचा धोकादायक ट्रान्सफॉर्मर या बाबतची माहिती दिली भविष्यात तेथे जिवीत हानी होण्याची शक्यता असल्याने तो ट्रान्सफॉर्मर तातडीने हलविण्याकामी अथवा त्याच्या चोहोबाजूंनी संरक्षण भिंत बांधण्याकामी आपल्या स्तरावर महावितरण कंपनीला तातडीने आदेश द्यावेत. तसेच ठाकुरपाड्याचा हमरस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या बाबतचे लेखी निवेदन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित यांनी अंबरनाथ नगरपरिषदेस सादर केले आहे. सदर प्रसंगी त्यांचे सोबत पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष पत्रकार अरुण ठोंबरे, आदिवासी विकास परिषदेच्या राज्य महिला प्रमुख किशोरी योगेश पाटील आणि ग्रामस्थ बारकु रामा उघडे इ. उपस्थित होते.

No comments