web-ads-yml-728x90

Breaking News

कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ७८ हजार पास वाटप


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ७८ हजार १८२ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ११ हजार व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात लॉकडाऊनच्या काळात (दि.२२ मार्च ते १३ जून  या कालावधीत)  कलम १८८ नुसार  १ लाख २९ हजार ४२४ गुन्हे नोंद झाले असून २६ हजार ६४० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ४५ लाख ६९ हजार ५५१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

No comments