BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
वंदेभारत अभियानांतर्गत फेज १ आणि २ अंतर्गत ४७ विमानांद्वारे एकूण ६ हजार ७९५ नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात
परतले आहेत. या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प्रवाशांचे
काटेकोर क्वारंटाईन करण्यात येत आहे.आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये २१०७
प्रवासी मुंबईचे आहेत.
उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २४८३ इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची
संख्या २२०५ इतकी आहे.आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश,
मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड,
जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान,
मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी अशा विविध देशातून प्रवाशी मुंबईत दाखल
झाले आहेत.
Post a comment