web-ads-yml-728x90

Breaking News

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास घेत त्याने आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. त्याने हे टोकाचे पाऊल का उचललं याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Sushant Singh Rajput suicide)
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने आत्महत्या केली, त्यादरम्यान त्याचे काही मित्र त्याच्या घरी होते. मात्र अचानक तो एका रुममध्ये निघून गेला. त्याला त्याच्या मित्रांनी आवाज दिला. मात्र त्याने रुममधून काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला आणि त्यावेळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. यानंतर त्याच्या मित्रांनी पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून तो मानसिक नैराश्येत होता. मात्र त्याने ही आत्महत्या नेमकी का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अवघ्या काही काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती.

No comments