ठाण्यात हॉस्पीटल उभारण्याचा पालिकेला विक्रम करायचाय का? आमदार डावखरेंचा सवाल
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाण्यातील ग्लोबल हबमध्ये उभारलेले १ हजार बेडचे विशेष कोवीड रुग्णालय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यातच मुंब्रा व खारेगाव येथील प्रत्येकी ४०० बेडच्या रुग्णालयांपाठोपाठ व्होल्टास कंपनीच्या जागेवर आणखी १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्याची घोषणा झाली आहे. ग्लोबल हबमधील रुग्णालयासाठी स्टाफ मिळालेला नाही. मग आणखी हॉस्पीटल उभारून ठाणे महापालिकेला विक्रम करायचा आहे का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी `ट्वीटर'द्वारे केला आहे. आधी हॉस्पीटलसाठी आवश्यक स्टाफची नियुक्ती करूनच कोविडसाठी नवी विशेष हॉस्पीटल उभारावीत, अशी सुचनाही आमदार डावखरे यांनी केली आहे.
No comments