web-ads-yml-728x90

Breaking News

पुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी केल्या. कोरोना प्रतिबंधासाठी  दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले.पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात आज सकाळीच दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने आज पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र, हॉस्पिटल तसेच पुणे महानगरपालिका येथे भेट देऊन पाहणी केली तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत एम्स नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सितीकांता बॅनर्जी उपस्थित होते. तसेच बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments