0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे. महाराष्ट्राने ‘मिशन बिगिन अगेन’ मधून कशी  झेप घेतली आहे ते सांगायचे आहे असे ठामपणे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पावधीतच  राज्याने उचललेल्या पावलांविषयी प्रभावी सादरीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे अशा काही मागण्याही केल्या.  गेल्या दोन-अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असतांना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या प्रारंभी पंतप्रधानांनी लडाख येथील घटनेची  माहिती दिली. व त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सीमेबाहेरील संकटाचाही  पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे मुकाबला करू असा विश्वास व्यक्त केला. 

Post a comment

 
Top