0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले होते. मात्र आता या लॉकडाऊनमध्ये हळहळू शिथिलता देण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक उद्योगधंदे व्यापाराची सुरूवात झाली होती. मात्र तरीही राज्यातील सलून व्यावसायिकांना दुकानं बंदच ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात येत्या रविवार म्हणजेच 28 जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. त्याच बरोबर ब्युटी पार्लर आणि जिम सुरू करण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारनं काही नियम व अटी ठेवल्या आहेत. त्या म्हणजे, सलूनमध्ये केवळ केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यास मात्र अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच सलून चालक आणि ग्राहक या दोघांना मास्क अनिवार्य आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.


Post a comment

 
Top