0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर |
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांनी नालेगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी सुशीलाबाई सकट, समिक्षा शिरापुरी, भिमराव सकट, श्रेयश मिसाळ, अरुण सकट, पूजा सकट, आदिती मोरे, सानिया शेख, श्रुती कुचेकर, ओम दहीवळकर उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थी शाळेपासून दुरावले आहेत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे दिले जात असले तरी या वर्च्युअल शिक्षणात अडकून न ठेवता, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

Post a comment

 
Top