web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्यातील इशिका सामंत ने केली स्वखर्चातून पोलीस आणि नागरिकांना मदत


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक,डॉक्टर, नर्सेस व पोलीस  यांना विविध सामाजिक संस्था तसेच सरकार सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न करत होते,मात्र अनेक ठिकाणी सरकारी मदतीची वाट न पहाता ठाण्यातील प्रसिध्द समाजसेविका नूतन सामंत यांची कन्या कु.इशिका सामंत हिने स्वखर्चातून पोलीस बांधव तसेच शेकडो नागरिकांना मदत केली आहे.या मध्ये ३०० मास्क,२५० हातमोजे व शेकडो आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले आहे.इशिकाच्या या सामाजिक बांधिलकीची दखल अनेक सामाजिक संघटनांनी घेऊन तिचा सत्कार केला आहे.इशिका हिने साठवून ठेवलेल्या पैशातून तिने सामाजिक बांधिलकी जपत स्वताच्या जीवाची पर्वा न करता ठाण्यातील अनेक पोलीस स्टेशन तसेच रस्त्यावर उतरून मदत केली आहे.तिच्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या तिच्या कार्यासाठी तिची आई नूतन सामंत यांनी मोलाची साथ लाभली.

No comments