web-ads-yml-728x90

Breaking News

नॅशनल युथ काऊन्सील ऑफ इंडिया च्या मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी दर्शन जीवन मोरे यांची निवड


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
देशातील तरुणांना मार्गदर्शन करणारी आणि देशहितासाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ काऊन्सील ऑफ इंडियाच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी दर्शन मोरे यांची निवड करण्यात आली आहे. दर्शन मोरे यांचे समाजकार्य, जन संपर्क तसेच क्रिडा, शैक्षणिक, पर्यावरण आणि महाविद्यालयीन काळातील कार्याची दखल घेऊन युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचाना मूर्ती रामू यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याध्यक्ष डॉ. त्रेवीनीकुमार कोरे यांच्या मार्गदर्शनाने ही निवड केली आहे.
फेब्रुवारी मध्ये दिल्ली येथे झालेल्या भारतीय छात्र सांसद मध्ये दर्शन मोरे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.केमिकल इंजिनिअर असलेले दर्शन मोरे आजच्या सुशिक्षित तरुण युवकांना समाजकार्यामध्ये आणि  राजकारणामध्ये येण्यास प्रोत्साहीत करत आहेत. सुशिक्षित तरुण देशाचे भवितव्य बदलून देशाला महासत्ता बनवू शकतात ह्या विचाराने ते तरुण युवकांना मार्गदर्शन करत आहेत. तरुणांना सक्षम बनवण्यास नॅशनल युथ काऊन्सील ऑफ इंडिया कार्य करीत आहे.


No comments