web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडमध्ये केबल चालकाची ग्राहकाला उग्रटीची भाषा ; केबल चालकाचे परवाने रद्द करण्याची जिल्हाधिकारी यांना ग्राहकाची मागणी ; जिल्हाधिकारी यांनी लक्ष न घातल्यास लॉकडाऊन परिस्थितीत आंदोलन करणार


BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात केबल चालकाच्या कार्यालयातून आरेरावी भाषा वापरली असून सेट अप बॉक्सच्या माध्यमातुन हा प्रकार घडला असल्याचे चित्र समोर आले असता त्या केबल धारकाच्या नातेवार्इकानी फोन करून विचारणा केली असता त्यांच्या प्रश्‍नाचे निरासरण न करता त्यांच्याशी उध्दट पध्दतीची भाषा वापरून "तुम्ही कशाला बोलता जे ग्राहक आहेत त्यांनी आमच्याशी बोलावं तुमचा काही संबंध नाही" असे कार्यालयातील तेथिल एका महिलेने शब्दात उत्तरे देऊन त्या ग्राहकाच्या नातेवार्इकाला काही राजकीय लोक पाठिमागे असल्याची चाहुल ग्राहकांना आपल्या उध्दट पध्दतीच्या भाषेतून समोर आणली आहे.
          सदरची घटना अशी की,इन केबलला सध्या मुरबाड शहरात ग्राहकांनी पसंत केलं होतं.परंतु वादळी वार्‍याच्या झोक्यात अनेक ग्राहकांना त्याचा फटकाही बसला आहे.अशातच इन केबल चे मुरबाडशाखेतून तुमचा सेट अप बॉक्स दुरूस्ती करून चालू होर्इल अशा शब्दावर ग्राहकाने तो बनविण्यास सांगितले कालांतराने तो सेट अप बॉक्स दुरूस्त झाला की नाही याची माहिती इन केबल चालकाने दिली नसल्याने ग्राहकांनी व त्याच्या नातेवार्इकांनी विचारणा केली असता तेथिल महिला यांनी उग्रटीच्या भाषेत ग्राहाकांशी संवाद साधल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.ज्या ग्राहकांना मार्गदर्शन करायचे होते तेथे तेथिल महिला उग्रटीची भाषा झाडायला तयारच असते.अशातच सेटअप बॉक्स खराब झाले असुन ते दुरूस्ती होणार नाही याची परिकल्पनाही दिली गेली नसल्याने ग्राहकांना गेले 10 ते 12 दिवस तात्कळत ठेवण्यात आले.ग्राहकांनी ऑफीसमध्ये वारंवार संवाद साधल्याने महिलेची उग्रटीची भाषा एैकायला मिळत असून फोन ठेवण्यात यायचा.मुख्य कार्यालयासाठी संपर्क साधण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला परंतू त्या महिलेने माझ्याकडे नंबर नसल्याचे उग्रटीत सांगत अतुल नामक यांचेकडे जा असे सांगत प्रश्‍नाच्या निरासरणाला मागोवा केला.याच इन केबलचे मुख्यकार्यालय कल्याण येथून असून मुरबाडची शाखा मात्र लबाडीची बनत आहे.इन केबल दरमहिने 250 ते 300 रूपये आकारत असून केबल काही तर काही दिवस चालत नसल्याचे ग्राहकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.याच इन केबलच्या मागील लार्इन चोरीचा विषय संपुर्ण जिल्हयात गाजला होता त्यावेळी चोरून केबल देत असून नागरिकांची लयलूट केली जात असल्याची माहिती मिळाली होती.मनोरंजनच्या नावाखाली विविध बोगस जोडणी करून चोरीचा प्रकार केला असल्याची चर्चा होती.नागरिकांच्या तक्रारी,समस्याला केराची टोपली इनकेबल दाखवत असुन आता ग्राहकांनी इनकेबल ला राम राम करत डिश टिव्हीवर विश्‍वास टाकला आहे.अशामध्ये याच मुरबाडच्या इनकेबल शाखेच्या जोडण्यांची मात्र चौकशी मंत्रालय विभागातून व्हावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे.कारण रजिस्टरवर एक आणि समोर एक असा प्रकार कदाचित उघडू शकतो.सदर मुरबाड इनकेबल कोणाच्या नावावर चालवला जातो व ग्राहकांशी उग्रटीची भाषा करणारी त्या महिला व अतुल नामक यांना कायदेशीर बाबतीत कोणी बसविले आहे तसेच त्यांनी मुख्यकार्यालयास व शासनास जोडणी व डिपॉझिट संबंधी व कोणकोणत्या ग्राहकांच्या समस्या ,तक्रारीचे निरासरण केले ही माहिती जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मागवून घेऊन चौकशी करून बेकायदेशीर आढळल्यास मुरबाड येथिल इनकेबल तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकार पत्रकारांच्या समोर आल्याने पत्रकारांनीही याकडे लक्ष वेधले आहे.जिथं 72 तासात तक्रारी किंवा समस्याचे निराकरण करायचं होतं तिथे 10 ते 12 दिवस लावूनही ठणठण मुरबाड इनकेबल चालकांनी केला आहे.त्यातच मुरबाड तहसिलदार मनोरंजन विभाग पाहत होते परंतू आता याच इन केबलची चौकशी करून परवाने रद्द करण्याची मागणी थेट जिल्हाधिकारी ठाणे यांना करण्यात आली असून कोणतीही कारवार्इ न झाल्यास लॉकडाऊनमध्ये सर्व ग्राहक आंदोलन छेडतील असा इशारा दिला आहे.


No comments