web-ads-yml-728x90

Breaking News

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी, माजी मंत्री बबनराव लोणीकरांचा घणाघात


BY - युवा महाराष्ट्र लाइव – परभणी | 
"संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून कोरोनाला आळा घालण्यात महाराष्ट्र सरकारला पूर्णतः अपयश आले आहे, गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार या सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यात सरकारला अपयश आले असून सरकार म्हणून प्रत्येक पातळीवर महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे" असा घणाघात राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी शहर पाथरी व मानवत तालुक्यांमध्ये आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोणीकर बोलत होते.मराठवाड्यातील वसमत शहर वसमत ग्रामीण लातूर शहर नांदेड जिल्ह्यातील हादगाव परभणी शहर परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत लातूर जिल्ह्यातील निलंगा व शिरूर अनंतपाळ या तालुक्यांमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून जनसामान्यांची कथा जाणून घेण्यासाठी व मोदी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त शासनाचे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोणीकर व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याची जबाबदारी लोणीकरांवर पक्षाने दिली आहे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स ला महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे माजी आमदार विजय गव्हाणे मोहन फड अजय गव्हाणे रामदास पवार शिवराज नाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments