BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यात
आपल्या घरी परत जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एस.टी.च्या लालपरीची मोठी सुविधा उपलब्ध
झाली. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना घेऊन रेल्वेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या बसगाड्यादेखील राज्याच्या चोहोबाजूला
असलेल्या विविध राज्यांच्या सीमेपर्यंत धावल्या. ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख
३७ हजार ५९३ स्थलांतरित नागरिकांना रेल्वे स्थानक आणि त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत
पोहोचविण्यासाठी ३१ मे पर्यंत या एस.टी बसगाड्यांनी
तब्बल १५२.४२ लाख कि.मी चा प्रवास केला.
महाराष्ट्रातून परराज्यात
जाणाऱ्या नागरिकांना सुखरूप परतता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेस उपलब्ध करून
दिल्या.एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत
नेऊन पोहोचवले, त्यासाठी राज्य शासनाने १०.८९
कोटी रुपयांचा खर्च केला.औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा एस.टी.
महामंडळाच्या सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या
राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने
बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली.
Post a comment