web-ads-yml-728x90

Breaking News

उच्चशिक्षत बनकर आणि क्षीरसागर यांनी लॉकडावून मध्ये सत्यशोधक विवाह करून दिला आदर्श-रघुनाथ ढोक


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पुणे |
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे नुकतेच विधिकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे निवास्थानी म्हणजे मनोगत अपार्टमेंट, पर्वती,पुणे  येथे महात्मा फुले यांनी प्रतिपादन केलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीला अनुसरून सत्यशोधक अमोल सुभाष बनकर,(एम. टेक ),पंढरपुर  आणि सत्यशोधिका चंद्रिका सुरेश क्षीरसागर, (डिप्लोमा नर्सिंग), लोनंद  यांचा  रजिस्टर नोंदणी करून  रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्यशोधक विवाह पद्धतीने मोफत विवाह लावला.यावेळी वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा सौ. आशा ढोक यांचे हस्ते भेट दिली. तर वधु वर यांचे शुभहस्ते सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतल्यास हार अर्पण केला. ढोक यांचे मागे  सर्वानीच महात्मा फुले रचित अंखडाचे गायन व भारतीय सविधान  उद्देशिकाचे वाचन केले.
       यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की या दोन्ही कुटुंबाने आर्थिक खर्च   उधळपट्टी  न करता अंधश्रद्धा , कर्मकांड या प्रथांना छेद देत कोव्हीड 19 च्या नियमाप्रमाणे सत्यशोधक विवाह करून वधु वर यांनी राष्ट्रीय ग्रंथ भारतीय सविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय भेट देत, जबाबदारीची शपथ घेऊन एकमेकांना हार घातले.या  उच्चशिक्षित वधु वरांनी सर्व समाजाला  आदर्श विवाह सोहळा कसा असतो याचे दर्शन दिले. पुढे रघुनाथ ढोक असेही म्हणाले की प्रथम वधु चंद्रिका ही ससून हॉस्पिटल मध्ये नर्स चे काम करून समाजसेवा करीत आहे.  विधुर अमोल यांची पत्नी कै. शुभांगी हिचे अपघाती निधन झाले म्हणून त्यांची 5 वर्षाची मुलगी अनया व 1 वर्षाचा मूलगा अद्वित यांची प्रत्यक्ष जबाबदारी घेऊन तिने सत्यशोधक पद्दतिने विवाह केला सोबत स्वतःचे घरातही एक आदर्श समाजसेवा करीत संसार करणर आहे ,तिच्या या धाडशी निर्णयाचे कौतुक करावे तेवढे कमीच असून तिला समाजाने साथ द्यावी असे  आव्हानही केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त सुदाम धाडगे म्हणाले की कोव्हीड 19 मुळे सर्व समाजाला सध्या कमाल 50 सगेसोयरे यांचे उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली असून या पुढे आर्थिक मंदी निर्माण होणार असल्याने सरकारने हे बंधन पुढील काही वर्षे ठेवावे त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी होईल. विष्णु बनकर म्हणाले की सत्यशोधक विवाह ही पद्दत सर्वानीच आमलात आणली तर खऱ्या अर्थाने फुले शाहु आंबेडकर यांचे कृतिशील कार्य व मानवसेवा केल्याचे समाधानही मिळेल. रघुनाथ ढोक व सुदाम धाडगे सर यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टाक म्हंटले तर विष्णु बनकर (चार्टर्ड इंजिनिअर, सिनियर मॅनेजर, संशोधक) यांनी विवाहासाठीचे प्रबोधन व व्यवस्थापन देखील केले. सर्वांचे आभार आकाश ढोक यांनी मानले.मोलाची मदत क्षितींज ढोक यांनी केली .तर वधु वर यांचे नातेवाईकांनी गावावरुन विडिओ कॉल द्वारे सोहळा पाहून शुभाशीर्वाद दिले.यावेळी अक्षता म्हणून फुले वापरण्यत आले.


No comments