web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचा युवा तरूण नागरिकांच्या सोबतीला ; अभिजीत रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याला नागरिकांचा मिळतोय आशिर्वाद


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आपण बारकार्इन पाहिले तर या जगात आपले नातेवार्इक सोडले तर कोणी ना कोणाचं असे उत्तर नक्कीच मिळेल.दुसर्‍याच्या सुखात तर सगळेच येतात परंतू मयत वगळून दुखःच्या सावटयात कोणी येत नाही हे ही आपण जाणतो.परंतू आत्ताच्या परिस्थितीत जो धाऊन आला तो देवच अशी कल्पनाही करणं योग्यच ठरेल.सामाजिक कार्यात समाजसेवकाची भुमिका ही निस्वार्थी ठरत असून असाच निस्वार्थी आणि बेधडक,कर्तव्यावर,सर्वांच्या दुखःत असणारा समाजसेवक हा जो फक्त एकाच हाकेला धाऊन येणारा युवा तडफदार म्हणून मुरबाडच्या भुमित  राहून 24 तास सेवेस तत्पर राहणारा आणि जो जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था,देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून सदैव सामाजिक चळवळीतून कार्यरत राहणारा अभिजीत रविंद्र शिंदे यांच्या कार्याची चर्चा आता तालुक्या स्तरावरून जिल्हा आणि महाराष्ट्र स्तरावर होत आहे.अभिजीत शिंदे यांचे गुरूवर्य व सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मोफत उपक्रम राबवून प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपर्‍यात जनसामान्यांना आधार दिला आहे त्यामुळे अभिजीत शिंदे यांना आधारवड म्हणून ओळखले जाते.या तरूणाचे मनोधैर्य तडफदार असल्याने अवघ्या एका वर्षात सामाजिक कार्याचा ठसा आपल्या लहान वयातच उमटवला आहे.जिल्हापरिषद शाळेत 80 हजार वहृया वाटप,मुरबाड,सरळगावमध्ये युपीएससी आणि एमपीएससी प्रभावी लायब्ररी,आरोग्यशिबीराच्या माध्यमातून गोरगरिबांच्या डोळयांचे मोफत उपचार करून श्रवणयंत्राचे वाटप,दरवर्षी फळझाडे वाटप,रक्तदान शिबीरात उच्चांक,मुरबाड तालुक्यातील महिला सक्षमीकरणातंर्गत बचत गटांना हातगाडया वाटप,बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्दयोगधंद्दयांच्या जोडीला प्रशिक्षण केंद्र,तसेच मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा या सर्व सामाजिक कार्यामुळे मुरबाडचा भुमिपुत्र म्हणून अभिजीत शिंदे व त्यांचे सहकारी अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर परेश शिंदे यांच्या कार्याचा गवगवा सध्या सर्वत्र होतांना दिसत आहे.मनुष्य बळ जरी कमी असले तरी आपले नैतिकतेचे धोरणा गरूडझेपाचे असायला हवे असे विचार मनात बाळगून सर्वांची साथ ठरलेले अभिजीत शिंदे यांच्या सामाजिक चळवळीच्या कार्याला नागरिकांचा भरघोष असा आशिर्वाद मिळत आहे.त्या गोरगरिबांच्या आशिर्वादामुळे आणि सर्व नागरिकांच्या विश्‍वासाने आपण व आपली संस्था,संघटना उत्तुंग कार्यभरारी घेत जावो अशा सदिच्छा अभिजीत रविंद्र शिंदे यांना ठिकठिकाणाहून मिळत आहेत.


No comments