web-ads-yml-728x90

Breaking News

'सामना'तून सोनू सूदच्या कामावर प्रश्नचिन्ह


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याची सोय करत (Saamana Rokthok criticizes Sonu Sood)  आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनू सूद याने केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थितीत करत टीका करण्यात आली आहे.
“लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

No comments